राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्याप्रमाणेच धुळे जिल्ह्यात ही महायुतीने मुसंडी मारली..या निवडणुकीत धुळ्यातील शिंदखेडा मतदारसघातून जयकुमार रावल यांनी भाजपला यश मिळवून दिलं..आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत भाजपकडून त्यांना रिटर्न गिफ्ट देण्यात आल आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी देण्यात आली आहे.जयकुमार रावल धुळ्यातील शिंदखेडा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा आमदार झाले. आज सकाळी त्यांना भाजप कार्यालयातून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला आहे.. त्यामुळे त्यांचा भाजपकडून योग्य सन्मान केल्याची प्रतिक्रिया धुळ्यात आहे.
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात महायुतीन मुसंडी मारत विरोधकांना हद्दपार केलं.. या जिल्ह्यातील रावेर यावेल मतदारसंघात शिंदखेडात भाजपचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावलं यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप बेडसे यांचा पराभव केला..धुळ्यात भाजप महायुतीला १०० टक्के यश मिळाले. त्यामध्ये जयकुमार रावल यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देण्यात आली.
जयकुमार रावल हे 2004, 2009, 2014, 2019, 2024 असे सलग पाच वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्रीपदी त्यांची निवड झाली होती. रोहयो, पर्यटन, अन्न औषध, राजशिष्टाचार या खात्याचा कारभार त्यांनी सांभळला आहे. यावेळी त्यांच्याकडे कोणत्या खात्याचा पदभार मिळणार, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे..
या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रीपदे आली आहेत.. तर शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदे यांच्यांसह १२ मंत्रीपदे तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 10 खाती मिळणार आहेत.