राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीत नाराजी सत्र सुरू झाल आहे.. या सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळाव यासाठी अनेक आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावली होती.. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली. आज सकाळपासून या विस्तारासाठी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमदारांना फोन गेले.. तर काही आमदारांना डच्चू मिळाला.अशातच आता शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे..
भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदाच्या आश्वासन दिले होते.. मात्र मंत्रिमंडळात त्यांना कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज आहेत की काय? अशा चर्चेला आता सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही विस्ताराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जे.पी.नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत बोलणे झाले होते. त्यानंतरही शब्द पाळला गेला नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे. त्यांची ही मंत्रीपदाची संधी हुकली आहे..
दरम्यान आता या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून महायुतीत नाराजीचा सुरू उमटला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी असेही म्हटले की,.फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही. निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी महायुती काम केले. त्यामुळे पक्षाला मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. परंतु आपण एनडीएमध्ये राहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहून त्यांच्या सोबत आहे. मी केंद्रात मंत्री आहे. बाहेर पडणार नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.