राजमुद्रा : तब्बल तीन वर्षांनी जळगाव जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयातील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या चोरीचा उलगडा नुकताच समोर आला आहे.. या शैक्षणिक संस्थेतील कागदपत्रे चोरणे आणि मारहाण धमकी केल्याप्रकरणी निलेश भोईटे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिसात आज चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ॲड.प्रवीण चव्हाण, विजय पाटील,संजय भास्कर पाटील, विनोद प्रभाकर पाटील आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव मधील मराठी विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या कार्यालयात 19 जुलै 2021 रोजी चोरी करण्यात आली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा करण्याच्या हेतूने दांडगाईने प्रवेश करून मुळ शिक्षक हजेरी बुक एकुण २, आवक जावक रजिस्टर, मानद सचिव यांच्या नावाने असलेले संस्थेचे लेटर हेड बुक, ऑडीट संदभांतील कागदपत्रे, तसेच ईतर महत्वाची अनेक कागदपत्रे चोरली. प्राचार्य व इतर काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि धमक्या दिल्या. त्यानंतर आता या चोरीच्या गुन्ह्याबद्दल आणि मारहाणी बद्दल चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
या संस्थेतील चोरी केलेल्या कागदपत्रांची बनावटीकरण करून त्यातील काही कागदपत्रे संगनमताने क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व इतर काही शासकीय कार्यालयात वापरली. हे खरे असल्याचे सांगून त्यांनी ठिकठिकाणी वापरले म्हणुन भारतीय दंड विधानच्या कलम ४५२, ३७९,३२३, ५०४, ५०६, १९३, ४६५, ४६८, ४७१, सह ३४ तसेच १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी विजय पाटील यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.