राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये राजभवनावर पार पडला.. यावेळी महायुतीच्या ३९ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमधील ज्येष्ठ नेत्यांपासून शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. सर्वात आधी चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळ सोहळ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडून नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली.
या शपथविधी सोहळ्यात भाजपचा पंकजा मुंडे आणि आशिष शेला तसेच शिवसेनेच्या आदित्य तटकरे यांनी देखील राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतली.यांचा समावेश कॅबिनेटमध्ये करण्यात आला..तसेच भाजपचे गिरीश महाजन, गणेश नाईक तसेच शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली..त्याच्यासोबत शिवसेनेच्या दादा भुसे यांच्यासोबत संजय राठोड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी देखील शपथ घेतली..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील या विस्तारात भाजपच्या मंगलप्रभात लोंढा,जयकुमार रावल,पंकजा मुंडे आणि शिवसेनेचे उदय सामंत यांचा समावेश आहे..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये नाही त्याच्या स्वतःच्या सूत्रानुसार 21 -12 -10 अनुक्रमे भाजप- शिवसेना -शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शपथ घेतली.. यामध्ये नवीन चेहऱ्यानां जास्त संधी देण्यात आली आहे..