राजमुद्रा : महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या 39 मंत्र्यांनी नागपूर येथील राजभवनावर शपथ घेतली..या शपथविधी सोहळ्यात भाजपाकडून 19 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. तर शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात 36 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्री असणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने मुसंडी मारली. या विजयानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. तर त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. दरम्यान आज मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाने तीन महिला नेत्यांना स्थान दिला आहे…
भाजपा कॅबिनेट मंत्री : चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, अशोक उईके, जयकुमार रावल, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, पंकज भोईर
शिवसेनेचे मंत्रिमंडळातील नवे मंत्री : शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्या पक्षाला 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.
शिवसेना कॅबिनेट मंत्री : शंभुराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल, योगेश कदम
राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रिमंडळातील नवे मंत्री : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 कॅबिनेट, तर एक राज्यमंत्रिपद मिळालं आहे.
कॅबिनेट मंत्री : हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव-पाटील, धनंजय मुंडे, इंद्रनील नाईक
महायुती सरकारच्या या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने नऊ चेहऱ्यांना तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने पाच नव्या चेहऱ्यानां तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे