राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे.हे हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार आहे.. या अधिवेशनात पुरवणी मागण्यांसह नवीन विधेयक सादर केले जाणार आहेत..आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. त्यासोबतच आज अधिवेशनात काही नवीन विधेयक मांडली जाणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार आहेत.
आज सोमवार (१६ डिसेंबर) पासून ते शनिवारी (२१ डिसेंबर) या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. आज सभागृहात मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे.. तर दुसरीकडे विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी पहिल्याच दिवशी विधिमंडळात विविध मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून हिवाळी अधिवेशनात 20 विधेयक मांडली जाण्याची शक्यता आहे. मात्र संख्याबळ नसल्याने महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणं कठीण आहे.. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आला आहे उद्या सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे..
आज पासून सुरु होणारे हिवाळी अधिवेशन महायुती सरकारचे पहिले अधिवेशन असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे..कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन गाजणार आहे.. या अधिवेशनात सरकार आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
दरम्यान कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम मुद्द्यांवर चर्चा या अधिवेशनात होणार आहे.
या अधिवेशनात लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार आणि इतर अनेक बाबींबर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. तसेच सरकारकडून यावर काहीतरी ठोस निर्णय घेतले जावे, अशीही अपेक्षा केली जात आहे.