राजमुद्रा : राज्यातील सत्ता बदलानंतर विधिमंडळातील हालचालींना चांगलाच वेग आला आहे.. विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा भाजपच्या गळ्यात पडली आहे आता विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. अशातच आता कर्जत जामखेड मतदारसंघातून पराभूत झालेले आमदार राम शिंदे यांना भाजपकडून विधान परिषदेच्या सभापतीपदी संधी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..
नुकताच राज्य सरकारचा हिवाळी अधिवेशन सुरू आहे.. यादरम्यानच विधान परिषदेच्या सभापती पदाचा मुहूर्तही ठरणार आहे..विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधानपरिषद सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वानाच आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर, सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या सभापतींची देखील लवकरच निवड केली जाणार आहे. भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.. हा पदभार स्वीकारल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री व 3 राज्यमंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला. मात्र या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विधिमंडळाच्या गोत्यात हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी
शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनाच पुन्हा सभापतीपदाची संधी मिळेल, असा विश्वास शिवसेना नेत्यांना आहे. मात्र, भाजपकडून राम शिंदे (Ram Shinde) यांना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे.