राजमुद्रा : महायुती सरकारमधील राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता खाते वाटपाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे….या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेची यादी सोपवली आहे..एकनाथ शिंदे स्वतःकडे गृहनिर्माण खातं ठेवणार आहेत तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं, तर भाजपकडे गृहखात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची पुन्हा महिला आणि बालविकास कल्याण या मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
कोणाला कोणती खाती मिळणार?
भाजप- गृह, महसूल,सार्वजनिक बांधकाम,पर्यटन,ऊर्जा
शिवसेना- नगरविकास,गृहनिर्माण
राष्ट्रवादी काँग्रेस- अर्थ, महिला आणि बालविकास, उत्पादन शुल्क
दरम्यान नागपूर मध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला.. या सोहळ्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.. यामध्ये भाजपच्या 19 शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.. या शपथविधीनंतर आता येत्या 24 तासात महायुतीच खाते वाटप होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेची यादी पाठवली आहे.. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आज मुख्यमंत्री यांच्याकडे दिली जाणार आहे. त्यानंतर ही यादी राज्यपालांना संपूर्ण सादर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे..