राजमुद्रा : महायुती सरकारच्या राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारानंतर विधिमंडळाच्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून विधान परिषदेच्या सभापती पदाची निवड झाली आहे.. विधान परिषदेतील संख्या बळामुळे भाजपने सभापती पद आपल्याकडेच ठेवल असून राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक होत्या. विधानपरिषदेचे सभापतीपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात आली.
विधान परिषदेच्या सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी कालची मुदत होती. मात्र या पदासाठी भाजपचे राम शिंदे यांनीच फक्त अर्ज दाखल केला होता त्यानुसार आज त्यांची निवड झाली..राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७ जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. यानुसार भाजपने राम शिंदे यांची निवड केली.. दरम्यान याआधी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीत अध्यक्षपदाची राहुल नॉर्वेकर यांच्या गळ्यात माळ पडली.
राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी कारभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी राम शिंदेंना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा नंतर राम शिंदे यांनी विरोधी पक्षाचे आभार मानले..