राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये भाजपमधील 19, शिंदेंच्या शिवसेनेमधील 11 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 9 नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली नसल्यामुळे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. या नाराजी नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला.. तरी देखील पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे आता छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..
छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली होती.. त्यांना मंत्रिमंडळात डावल्यानंतर आता ते ओबीसी नेत्यांशी चर्चा करून शरद पवार गटात सामील होणे, भाजपमध्ये जाणे किंवा स्वतःचे ओबीसी संघटन तयार करणे या पर्यायांवर विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भुजबळ आज मुंबईत येणार असून दोन दिवस समर्थकांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे मात्र छगन भुजबळ हे नागपूर मध्ये सुरू असलेले हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकला दाखल झाले.. नाशिक मध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर काल ते मुंबईत दाखल झाले त्यानंतर ते राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेऊन आपला मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावल्यानंतर छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी शरद पवार गटात येण्याचं आवाहन केलं आहे..त्यांना मंत्रिपदापासून डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. भुजबळ जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे.