राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली.. या घटनेचे पडसाद विधानसभेत ही उमटले.. या प्रकरणी सभागृहात चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा काल केली होती.. या घोषणेला 24 तास उलटत नाही तोच बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करत त्यांच्या जागी नवनीत कावंत यांची नियुक्ती करण्यात आली..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बीड पोलिसांच्या कारभारावर नाराजी दर्शवली.. शिवाय कारवाई करण्यास त्यांनी कुचराई केल्याचाही म्हटलं.. यानंतर या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. या घोषणेला 24 तास होण्याआधीच त्यांनी बदली करण्याचा निर्णय घेतल्यास ही सांगितलं. मागील काळातील जी प्रकरण समोर येत आहे..त्या सगळ्यात पोलीस प्रशासनाची कुचराही दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपयुक्त म्हणून कार्यरत असलेले नवनीत कांवत यांच्याकडे आता बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवनीत कांवत हे 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.. ते मूळचे राजस्थानचे असून त्यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत.. आता बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकाचा पदभार ते सांभाळणार आहेत.
दरम्यान या हिवाळी अधिवेशनात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी या घटने प्रकरणी सभागृहात आवाज उठवला.. दरम्यान आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उतरले असून बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे घेऊन ते मसाजोग गावात पोहोचले आहेत.. ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करत असून त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. दरम्यान या जिल्ह्याला आता कडक शिस्त असणाररा अधिकारी भेटला आहे.. दरम्यान हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.. यामध्ये सभागृहात कोणता मुद्दा उपस्थित केला जातो याकडे राजकीय वर्तुळाचा लक्ष लागला आहे.