राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला.. या विस्तारानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.. या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून हे अधिवेशन बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्यांनी गाजलं.या अधिवेशनाची आज सांगता होणार असली तरी अद्याप सरकारचे खातेवाटप झालेले नाही..यामुळे बिन खात्याच्या मंत्र्यांना विधानसभेत प्रश्नांना उत्तरही देता आले नाही.. दरम्यान त्यामुळे विरोधकांच्या या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली. त्यानंतर, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या होणाऱ्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान नागपूरमधील या सहा दिवसाच्या अधिवेशनात सर्वाधिक चर्चाही बीड आणि परभणी घटनेवर झाली.. या प्रकरणावरून कायदा सुव्यवस्था संदर्भात पहिल्या दिवशीच सोमवारपासून विरोधकांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलनाला सुरुवात केली होती.. दरम्यान आज बीड घटने प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या घोषणेनुसार पोलीस अधीक्षक यांची बदली करण्यात आली.. आणि बीडच्या जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले..
या अधिवेशनात बीड आणि परभणी घटनेवरती अनेकदा सभागृहाच्या बाहेर आंदोलन झाली आणि सभागृहात 101 अन्वे चर्चा करून आणली. या चर्चेवरती भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप करत वाल्मीक कराड आणि एक मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. तर, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणावरुनही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. या दोन्ही प्रकरणाची चौकशी समिती गठीत करण्यात आली.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात अमित शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सभागृहात त्याचे पडसाद उमटले, विरोधकांनी निषेध व्यक्त करत आंदोलन केलं. नागपूरच्या संविधान चौकामध्ये मोर्चा काढत विधानभवनातही सर्व विरोधकांनी जय भीमचा नारा देत मोठ आंदोलन पायऱ्यांवरती केलं.
या अधिवेशनाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावात चर्चा करताना पीक संदर्भात सुरेश धस यांनी महायुतीला घेरल..कापसाला योग्य भाव नाही म्हणून एक दिवस सहभागृच्या बाहेर विरोधकांनी पायऱ्यावरती आंदोलन केले. काही महत्त्वाची विधेयक मांडली गेली, त्यामध्ये जन सुरक्षा विधेयक यावरती चर्चा करण्यात आली. कारगृह सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. ही सर्व चर्चा झाली असली तरी विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भावरती मात्र वेगळी चर्चा करण्यात आली नाही. अंतिम आठवडा प्रस्तावमध्ये विदर्भ संदर्भात अवघ्या दोन ओळींचा उल्लेख करण्यात आला आहे.या अधिवेशनामध्ये सर्वाधिक बोलायला नवीन आमदारांना संधी देण्यात आली. बीड व परभणीच्या आमदारांनी आपली भूमिका सर्वाधिक मांडली.