राजमुद्रा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची 55 वी बैठक राजस्थानच्या जैसलमेर येथे पार पडली. मात्र या बैठकीत विमाधारकांच्या बाबत कोणताही निर्णय न झाल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. या बैठकीत जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवावा अशी मागणी करण्यात येत होती. मात्र यंदाच्या बैठकीत कोणताही निर्णय यावर झाला नाही.
या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सेकंड हँड इलेक्ट्रिक कार आणि लहान पेट्रोल आणि डिझेल कारच्या विक्रीवरील जीएसटी दरात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या कार खरेदीसाठी देखील ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावा लागणार आहेत. जुन्या आणि वापरलेल्या इलेक्ट्रिक कार आणि लहान पेट्रोल आणि डिझेल कारच्या विक्रीवरील जीएसटी 12 टक्क्यावरुन 18 टक्के करण्यात आला आहे. या बैठकीला अधिक अर्थमंत्री उपस्थित होते.
जीएसटी काऊन्सिल बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
जुन्या आणि वापरलेल्या ईव्ही आणि लहान पेट्रोल आणि डिझेल कारच्या विक्रीवर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल. सध्याचा दर 12 टक्के आहे.
लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटीमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला.
फोर्टिफाइड राईस कर्नेल्सवरील 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला.