राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले छगन भुजबळ बंड करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे . अशातच आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ सकाळी १० च्या सुमारास दाखल झाले. अर्धा तास या दोन्ही नेत्यांच्या मध्ये भेट झाली.. मात्र ही भेट नेमकी कोणत्या मुद्द्यावर झाली चर्चा सुरू आहे.याबद्दल मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र अचानक होणारी ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
नाराज झालेल्या छगन भुजबळांनी ओबीसी संघटनांसोबत एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ओबीसी संघटनेतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. यानंतर आज ते सकाळी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या आधी त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रत्येक पक्षाचा निर्णय पक्षाचा प्रमुख घेत असतो. जसे भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. त्याप्रमाणे आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात. असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते.
मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादीतुन बाहेर पडण्यासाठी चाचणी करत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे..राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आपले पक्षाचे अजित पवार यांची भेट न घेता ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत..त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या विरोधात बंड पुकारणार असल्याच स्पष्ट दिसून येत आहे.