राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात जळगाव ग्रामीण मतदार संघातून विजयी झालेले शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा पाणीपुरवठा खातं देण्यात आला आहे. फडणवीस सरकार मध्ये खाते मिळाल्यानंतर त्यांनी राज्यातील पाणीपुरवठा योजनांबाबत प्रतिक्रिया दिली आहे.. महाराष्ट्रात अजूनही 40% पाणीपुरी योजना पूर्ण करण्याचा आव्हान समोर असल्याचा त्यांनी म्हटले आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे गुलाबराव देवकर रिंगणात होते.. या निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला.. अखेर त्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळालं असून आता पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यानंतर ते म्हणाले माझ्याकडे पूर्वी असलेल्या खातच मला पुन्हा मिळालेला आहे राज्यात पाणीपुरवठ्याच्या योजना काही प्रमाणात पूर्ण झाले असून काही अद्याप पूर्ण व्हायच्या आहेत.. दरम्यान पाच वर्षाच्या काळात पाणीपुरवठा योजनेचा मला अनुभव असल्याने प्रलंबित असलेल्या योजनांना आणखीन गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
या पाणीपुरवठा खात्यात मला पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे.. ग्रामीण पाणीपुरवठा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय असतो त्यामुळे ही जबाबदारी मी जोमाने पार पडेल.. राज्यात काही ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा कामे संथ गतीने सुरू आहे जी काम थांबले आहेत त्यांना पुन्हा कशी सुरू करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.