राजमुद्रा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगले आहेत या भेटीनंतर त्यांनी आता पत्रकार परिषदेत घेत सूचक वक्तव्य केला आहे.. या भेटीत त्यांनी सामाजिक, राजकीय विषयांवर चर्चा केली असल्याचा सांगितलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच नुकसान होणार नाही.. ओबीसी ने यावेळेस महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला आहे त्याबाबत आपण सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले पाहिजेत. मला आठ ते दहा दिवस तुम्ही द्या आठ दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग काढू असा आश्वासन त्यांनी दिल असल्याचही छगन भुजबळ यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन छगन भुजबळ यांनी भेट घेतली.. तब्बल 40 मिनिटे या भेटीत चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उद्यानाला असतानाच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या विरोधात बंडाचे निशाण पुकारत असल्यास बोललं जात असताना राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यासाठी ते चाचणी करत असल्याचे चर्चा झाल्या. या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत सुचक वक्तव्य केला आहे.
दरम्या छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का,,असं विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की,ओबीसीच नुकसान आम्ही होऊन देणार नाही. त्यामुळे यापूर्वी मी सगळं बोललं आहे पुढील काळात अधिक स्पष्ट होईल असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये भूकंप होणार असल्याचा संकेत दिले आहेत.