राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.. अशातच आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे एकमेव आमदार असणारे वडगाव शेरी चे बापू पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.. ही भेट होताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.. मात्र ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्टीकरण ही बापू पठारे यांनी दिल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर वडगाव शेरीचे बापू पठारे हे एकमेव शरद पवार यांच्या गटात राहिले.. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट देण्यात आले.. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांचा पराभव केला.पुणे जिल्ह्यातून शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेले हे एकमेव यश होते.. दरम्यान आमदार पठारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होताच राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.. मतदारसंघातील विविध कामात संदर्भात चर्चा केली कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला केवळ दहा जागावर विजय मिळाला..दुसरीकडे अजित पवार यांनी दमदार कामगिरी केली त्यांच्या पक्षाला 41 जागावर यश मिळाले.या विधानसभा निवडणुकीत कमी जागावर त्यांना समाधान मानावे लागले..गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे चर्चा सुरू झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत काय घडतय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.