राजमुद्रा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीनंतर ते पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे..ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाऊ आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल, असं सांगत त्यांनी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले.
या भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की अख्या महाराष्ट्राचे ठाकरे कुटुंबीयांवर जीवापाड प्रेम आहे.. मी देखील राज ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे.. त्यांच्या कुटुंबासोबत मित्रत्वाचं नातं राहील आहे. उद्धव ठाकरे हे देखील माझ्या भाऊ आणि मित्राप्रमाणे आहे. काल ते एकत्र आले याचा नक्कीच आनंद आहे. असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.त्या दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. राज ठाकरे हे भाजपच्या सोबत राहून काम करतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही. महाराष्ट्र लुटण्यामध्ये मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे. अशा व्यक्तीसोबत जाणं, ही महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल, असे संजय राऊत म्हणाले.
माझ्या देशावर राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत यांचा कौटुंबिक संवाद झाला.. या भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कुटुंब एकत्र आल्यावर महाराष्ट्र दृष्टीने त्या प्रवाहात आम्हाला वाहत जाता येत नाही हा सुद्धा विचार महाराष्ट्राने केला पाहिजे.. मात्र आता काही निर्णय घ्यायचा हे उद्धव आणि राज ठाकरे भाऊ त्यांनी घ्यायचा आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल असेही संजय राऊत म्हणाले.