राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीतील पराभव महाविकास आघाडीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार आता ॲक्शन मोडवर आले असून पक्षात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या ते तयारीत आहेत.. पक्षातील युवक,युवती,अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष यांच्यासह विविध सेलचे प्रमुख बदलले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार आता भाकरी फिरवणार असल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दहा उमेदवार विजयी झाले त्यामुळे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. आता विधानसभेनंतर आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार ॲक्शन मोडवर आले असून पक्षात अनेक बदल करण्याची मागणी त्यांच्याकडे जोर धरत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीतील नेत्यांची आठ किंवा नऊ जानेवारीला मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे..
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष संघटनेत बदल करण्याच्या पार्श्वभूमीवर नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये ही बैठक होणार असून खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीला आमदार खासदारांसह सर्व विभाग प्रमुखाने जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.