राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच आता संगमनेर मध्ये राजकीय खेळी यशस्वी करणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी आमदार खताळ यांच्या माध्यमातून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तयारी लागण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे संगमनेर मध्ये पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात संघर्ष पाहायला मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीत संगमनेर मध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय मिळवला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा हादरा बसला.. आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना तयारी लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.. मंत्री विखे स्थानिक निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संगमनेर मध्ये लक्ष घालणार हे पुन्हा निश्चित झाला आहे.. तसेच विधानसभा निवडणुकीप्रमाणे संघटितपणे संगमनेर मध्येही यश मिळवायचं अशी बांधणी देखील ते करणार असल्याची माहिती समोर आली आहे..
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री विखे पाटील यांनी आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीला लढवल्या जातील असे सांगून तयारी करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात राधाकृष्ण विखे यांनी जलसंपदा मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.. या दिवसानंतर आता आगामी होणारे निवडणुकीसाठी ते ॲक्शन मोडवर आले असून निवडणुकीत यश मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले आहे..
विधानसभा निवडणुकीत विखे -थोरांतामध्ये पाहिलेला संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.. त्यांची ही राजकीय खेळी यशस्वी ठरणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..