राजमुद्रा : गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरण बीड हत्याप्रकरणावरून चांगलंच तापलं आहे. आता या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधतगंभीर आरोप केले आहेत.. बीड मधील हत्या प्रकरणातील गुन्हेगारांचा सूत्रधार मंत्रिमंडळात असल्याचा आरोप त्यांनी केला असून धनंजय मुंडेसह अजित पवारांचा राजीनामा घ्या अशी मागणी देखील त्यांनी केली आहे..
गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील वातावरण जास्तच होत चाललं आहे.. लवकरच आता पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे परभणी, बीडला जातीलं, असेही त्यांनी म्हटले आहे.. दरम्यान बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजपा – RSSचं संरक्षण आहे का ? असा सवाल करत तात्काळ बीड मधील शस्त्र परवाने रद्द करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे..
या आधी महायुतीचे मंत्री कितीही मोठा गुन्हेगार असला तरी खपवून घेतलं जाणार नाही, असं तुम्ही म्हणायचे ना. मग करा कारवाई . हे काय तुमचे जावई आहे का. बंदुकीच्या जोरावर धनंजय मुंडेंनी बीडमध्ये 118 मतदान केंद्रावर मतदान होऊ दिलं नाही, यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात..निवडणूक आयोगाला दिसत नाही का. फक्त आमच्यावर कारवाई होत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे..
बीडमधला प्रकार हा बिहारमधल्या अनेक जिल्हयात अशा प्रकारचा दहशतवाद चालायचा. अपहरण, खंडण्या, राजकीय हत्या, मग राजकीय हत्या करणाऱ्याला संरक्षण असं बिहराच चित्र होतं.
हे चित्र तुम्हाला बीड, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात दिसतय अशी टीका संजय राऊत यांनी केली.