राजमुद्रा : गेल्या काही दिवसापासून बीडच्या केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी आता बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवले जात आहे.. अशातच आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर जोर धरला जात असून त्यांच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत.. या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वाल्मिकी कराडचं नाव आल्यानं खळबळ उडाली आहे.. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.. निकटवर्तीय असल्याकारणाने आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या बीड मधील हत्या प्रकरणातील गुन्हेगाराचा सूत्रधार मंत्रिमंडळात असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. त्यांच्या पाठोपाठ आता संदीप क्षीरसागर यांनी देखील गुन्हेगार हे मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत..त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा व तीन-चार महिन्यात पूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी केली आहे..
दरम्यान याआधी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गौप्यस्फोट करत बीडचा आकार म्हणजेच वाल्मिकी कराबाबत खुलासा केला होता की या प्रकरणात मुख्य सूत्रधार तो असल्याचा त्यांनी म्हटलं होतं.. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली.. आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून तो ओळखला जाऊ लागला आहे..त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. बोलताना सुरेश धस सुद्धा म्हणाले, धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदा बाबत अजित पवार यांनी निर्णय घ्यावा.. मी पावणेतीन तालुक्याचा आमदार आहे..पावणे तीन तालुक्यावरती आमची अक्कल आहे तेवढे बोलतो..अजितदादानां आम्ही कोण सांगणार असंही ते म्हणाले.