राजमुद्रा : देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते नावाजलेले अर्थतज्ज्ञ, तसेच भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं काल (२६ डिसेंबर) निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. काल त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालययात दाखलचा श्वास घेतला.. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळवळ व्यक्त करण्यात येत आहे..त्यांच्या या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत
माझी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल होत.. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.त्यांचे पार्थिव दिल्लीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणारमनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या (शनिवार २८ डिसेंबर) अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचीं शक्यता वर्तवली जात आहे.. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आज दिवसभर मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील ३ मोतीलाल मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार,, इतर जेष्ठ नेत्यांसह दिग्दजाकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे…