राजमुद्रा : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे..त्यांचे सहकारी आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अत्यंत महत्त्वाचं असं योगदान दिलं.. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत.. मनमोहन सिंग हे एक अर्थशास्त्री विचारवंत होते.. त्यांची भूमिका ही नेहमी देशाच भवितव्य घडवण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे अशी असायची.. असं शरद पवार यांनी सांगितलं..
माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षाचे होते..गुरूवारी रात्री अचानक त्यांची तब्येत खालवली. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात नेलं. तिथे त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. मनमोहन सिंग यांच्या रुपाने देशाने आज एक रत्न गमावलं आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचा गौरव करताना असे सांगितले की, मनमोहन सिंग यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी ख्याती होती..10 वर्षाच्या कार्यकाळात असे अनेक निर्णय होते. उदहारणार्थ आरटीआय माहितीचा अधिकार किंवा रोजगार हमी सारखा निर्णय असे नऊ-दहा महत्त्वाचे निर्णय त्यांच्या काळात घेतले. सर्व देशाला वेगळ्या दिशेने न्यायचा प्रयत्न केला. असा कर्तृत्वान, चारित्र्यसंपन्न व्यक्तीला आज देश मुकला आहे” अशा शब्दात शरद पवार यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचा गौरव केला.