राजमुद्रा : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.. या बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे, असं सांगितलं जात आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या अजित दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला आहे..जर या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे तर खंडणी आणि हत्येतील आरोपी मोकाट कसे? त्यांना अजून अटक का नाही? असा सवालच त्यांनी विचारला आहे.
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 18 दिवस झाले तरी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील जनतेत संतापाचं वातावरण आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या बीडमध्ये निषेध मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या आधीच अजित पवार गटाच्या नेत्याने अजितदादांना घेरलं आहे. यावर बोलताना ते म्हणाले, अजूनही आरोपी मोकाट कसे? त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे.खून आणि खंडणी मागणाऱ्याला पोलिसांना अजूनही पकडता आलं नाही .एक आरोपी 18-18 दिवस फरार राहतो आणि पोलिसांना त्यांना पकडता येत नाही. हे काय नॉर्मल आहे का असा सवालच त्यांनी केला आहे..
बीड जिल्ह्यात पोलिसांना हाताशी घेऊन खंडणी वसूल करण्याचे काम झालं आहे.. राजकीय समर्थन असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाही असा दावाही त्यांनी केला आहे.. अठरा दिवस उलटले तरी अजून आरोपी मोकाट आहेत..उद्या मोर्चा निघणार आहे. सामान्य लोकांचा आक्रोश आहे. आरोपीला अटक होत नाही हे बीड जिल्ह्याचं दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.