राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीमध्ये आधी मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना डावलण्यात आला आहे.. मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे.. या नाराजी नंतर ते राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधान आलं असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.भुजबळांना बाजूला ठेवणे कुणालाही परवडणारे नाही, ते भाजपात जाणार नाहीत, भुजबळ साहेब दादा सोबतच राहतील असं त्यांनी म्हटलं आहे..
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांची देखील वर्णी मंत्रिमंडळात लागली, त्यांना अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय देण्यात आलं. दुसरीकडे मात्र छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं.. यावरून त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगु लागल्या. आता यावर नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे..मी भुजबळ साहेबांना भेटलो, नागपूरला रात्री भेट झाली. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते नाराज नाहीत तर वागणूक पटली नाही असं त्यांचं म्हणणं आहे
दरम्यान छगन भुजबळ आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्यात झालेल्या बैठकीत त्यांनी भुजबळ यांना त्यांनी राज्यसभा देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले.त्यावर बोलतान ते म्हणाले आता असं कसं म्हणता की राज्यसभा देतो. जनतेची आणि आमची हेळसांड होणार नाही याचा विचार करा, असं भुजबळ यांनी म्हटल्याचं झिरवाळ यांनी सांगितलं. आता छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.