राजमुद्रा : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.. या प्रकरणामुळे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचा पालकमंत्री पद घ्यावं अशी आग्रहाची भूमिका घेतली आहे.. म्हणजे बीड जिल्ह्यात काय झालं?कशामुळे या घटना घडल्या? अंधारातून कोण काय करतोय?हे समजेल असंही त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे आमदार प्रकाश सोळंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलाच घेरलं आहे..या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे, असं सांगितलं जात आहे. जर या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे तर खंडणी आणि हत्येतील आरोपी मोकाट कसे? त्यांना अजून अटक का नाही? असा सवालच त्यांनी विचारला आहे. या बीडमध्ये होत असलेल्या घटना वर आता लक्ष देण्याची गरज असून काय काय घडलं याचा शोध लावला गरजेचा आहे असा सवाल दुसरीकडे बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे..
या घटनेवरून राज्यातील वातावरण चांगलंच आपल्या असून खासदार बजरंग सोनवणे यांनी असे म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचा पालकमंत्री पद घ्याव..मात्र बीडचा पालकमंत्री पद हा माझा किंवा माझ्या पक्षाचा विषय नाही सत्तेतील तिन्ही पक्षांनी पालकमंत्री पदाबाबत ठरवलं पाहिजे.. असेही त्यांनी म्हटले आहे