राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभार स्वीकारला.. यानंतर आता राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये आता नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहे..अशातच आता गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाशी वर्णी लागणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोचली होती.. आता भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नेहमीच पक्षावर आणि सरकारवर आपली पकड रहावी यासाठी धक्का तंत्रांचा वापर केला गेला आहे.. आता भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठीचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढचा वारसा जवळपास त्यानी निश्चित केला आहे. जानेवारी महिन्यात शिर्डीला होत असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.. डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजय झाले..मात्र मंत्रीपदी त्यांना संधी मिळाली नाही..चंद्रशेखर बावनकुळे यांना महसुल मंत्रिपद मिळाले त्याचवेळी चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष मिळणार हे स्पष्ट झाले.. आता याची अधिकृत घोषणा जानेवारी येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात होणार आहे..