राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठया पराभवाला समोर जावं लागलं.आता यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसला तडकाफडकी राजीनामा दिला आहे..चिपळूण मनसेचे शहर प्रमुख अभिनव भुरण यांनी पक्षातील स्थानिक राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याच त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज ठाकरे यांच्यासमोर खचून गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जोश भरण्याच तसच कार्यकर्ते, पदाधिकारी टिकवून ठेवण्याच मोठं आव्हान आहे. त्यात आता कोकणातून मनसेला मोठा धक्का बसला आहे..चिपळूण मनसेचे शहर प्रमुख अभिनव भुरण यांनी राजीनामा देत वर्षानुवर्षे फक्त स्वतःचा फायदा करायचा आणि पक्षाला वाढवण्यासाठी स्थानिक नेतृत्व काम करत नसल्याचा ठपका ठेवला आहे.तसेच स्थानिक पातळीवरील नेते विश्वासात घेत नसल्याचा त्यांचा आरोपही त्यांनी केला आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचं भुरण यांनी पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जितका मोठा दारुण पराभव झाला, त्याहीपेक्षा मोठा पराभव मनसेचा झाला. ही सलग तिसरी विधानसभा निवडणूक आहे, ज्यात मनसेने इतकी खराब कामगिरी केलीय. 2009 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता त्यानंतर झालेल्या तिन्ही विधानसभा निवडणुकीत मनसेला छाप पाडणारी कामगिरी करता आलेली नाही..त्यानंतर आता हा पराभव नेत्याच्या जिव्हारी लागला असून आता राजीनामा सत्र सुरु झालं आहे.