राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला जात आहे.. या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून केला जात आहे.. त्यासोबतच बीड मधील हत्या प्रकरणाची चौकशीही बीड पोलिसांकडून केली जात आहे. अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा फरार आहे.मात्र आता त्यांची बँक खाती गोठवण्यात आल्याने लवकरच वाल्मिक कराड शरण येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील वाल्मीक कराड सहित अन्य तीन आरोपांची बँक खाते उठवण्यात आली.. त्यामुळे आता त्याला शरण येण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.. त्याप्रमाणे पासपोर्ट संदर्भातील कारवाई सुरू करण्यात आली असून वाल्मीक कराड कडे पासपोर्टच नसल्याने तो देशावरही जाऊ शकत नाही.. त्यामुळे पुढील काही तासातच वाल्मीक कराड शरण येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे त्याच्या पत्नीची सीआयडी कडून कसून चौकशी सुरू आहे..संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार, वाल्मिक कराड याचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत.. त्यामुळे आता त्याला शरण येण्याशिवाय पर्याय नाही.
या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) 9 पथकं तयार केली आहेत. यात १५० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच या हत्याप्रकरणी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे. फरार आरोपींच्या संपर्कातील लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.त्यामुळे सध्या बीडमध्ये मोठी कारवाई सुरु आहे.