राजमुद्रा : बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.. या प्रकरणाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे..या प्रकरणातील सर्व आरोपींना अजून अटक करण्यात आलेली नाही मात्र या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून तपास सुरु असून वाल्मिक कराड अद्यापही त्यांच्या हाती लागलेला नाही.. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बॉम्ब टाकला आहे..त्यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर एक पोस्ट ट्विट केली आहे. त्यात वाल्मिक कराडसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री असणारा फोटो टाकला आहे. तो फोटो पोस्ट करुन संजय राऊत यांनी व्वा! क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे आता खरा अपराधी कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने वेगाने तपास चालू केला आहे मात्र आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.. या प्रकरणी चर्चेत असलेला वाल्मिकी कराड त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या काही दिवसापासून तो फरार आहे.वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराड यांचे संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले तसेच त्यांची बँक खाते ही गोठवण्यात आली..
आता याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत वाल्मिक कराड याचा असलेला फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटोत असणारा खंडणीखोर, खुनी, गावगुंड (वाल्मिक कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल. हाय का नाही मोठा जोक? असे राऊत यांनी म्हटले आहे. या फोटोला त्यांनी क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका? असे कॅप्शन दिले आहे.दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोनंतर राज्यातील राजकारण तापणार आहे.