राजमुद्रा : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमूळ गेल्या काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड गेल्या काही दिवसापासून फरार होता आता अखेर तो पोलिसांना शरण आला असल्याची माहिती समोर आली आहे.पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.
वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले आहेत. तरी या प्रकरणातील आरोपी सापडले नव्हते..आता वाल्मिक कराडने सरनागती पत्करली असून तो पोलिसांना शरण आला आहे.. त्याच्यावर खंडणीचे आरोप आहेत. पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता. त्यामुळे सीआयडीने 9 पथकं तयार केली होती. त्याचा महाराष्ट्रासह कर्नाटकात शोध घेण्यात येत होता.
वाल्मिक कराड हा उज्जैनला गेल्याचंही सांगितलं जात होतं. त्यामुळे पोलीस आणि सीआयडी अलर्ट झाले होते. अखेर आज त्याने स्वत:हून पुणे पोलीस आणि सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वाल्मिकी कराड सोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा फोटो शेअर करत त्यांना डिवचलं होत.. नंतर या प्रकरणाचा खरा प्राधिक कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र आता या हत्याप्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड याने शरणागती पत्करली आहे..त्यामुळे त्याची कसून चौकशी होणार आहे. त्यामुळे या चौकशीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..