राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेला वाल्मिक कराड हा गेल्या 22 दिवसांपासून फरार होता अखेर 22 दिवसानंतर तो पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला आहे..या त्याच्या शरणागतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना प्रश्नांना उधाण आल आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.. या बीड प्रकरणांमध्ये आम्ही कोणालाही सोडणार नाही..तसेच या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्याकरता वेगळ्या टीम्स कामी लागले आहेत त्यामुळे कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही.. सगळ्यांना शोधून काढू असं त्यांनी म्हटले आहे. तसेच गुंडांचे राज्य आम्ही चालून देणार नाही.. ज्याचा या प्रकरणाशी संबंध आहे त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात 302 गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र त्यामध्ये वाल्मिकी कराडचं नाव नाही यावरून आता चर्चांना उधाण आल आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाल्मिकी कराड वर 302 चा गुन्हा दाखल होणार का?असे विचारला असता त्यांनी याबाबत सगळी माहिती पोलीस देतील तसेच या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय घेतील असेही त्यांनी म्हटलं.. तसेच ही केस जाणीवपूर्वक सीआयडी कडे सोपवण्यात आली आहे..त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेले आहे त्यामुळे त्यांच्यावर कोणताही दबाव चालवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड याच्या शरणागतीनंतर अस आश्वासन दिले की, तुम्ही काही काळजी करू नका.. काही झालं तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकवत नाहीत तोपर्यंत पोलीस कारवाई करतील असं त्यांनी सांगितलं..