राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील मास्टरमाइंड वाल्मीक कराड याने शरणागती पत्करली आहे.. गेल्या 22 दिवसानंतर तो पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला आहे.. मात्र आता त्याच्या शरण नाट्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. पुण्यातील सीआयडी कार्यालयाच्या बाहेर मोठा ड्रामा पाहायला मिळाला.. सीआयडी कार्यालयात दाखल होताना तो स्कार्पिओ गाडीमधून आला.. मात्र आता ती गाडी नेमकी कुणाची येऊन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.. दरम्यान वाल्मीक कराड याचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवलिंग मोराळे यांच्या गाडीमधून वाल्मीक कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे..
बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गेल्या 22 दिवसापासून पोलीस शोधत आहेत मात्र बाकीचे आरोपी फरार आहेत त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान आज या प्रकरणातील मास्टरमाइंड आणि खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास पुण्यातील पाषाण येथील सीआयडी कार्यालयात शरण आला.. शिवलिंग मोराळे यांच्या स्कार्पियो मधून तो कार्यालयात दाखल झाला.. यावेळी त्यांच्यासोबत मोराळेही होते.
दरम्यान मास्टरमाइंड वाल्मीक कराड ज्या कारमधून आला ती कार आता सीआयडीने ताब्यात घेतली आहे.. शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे.. दरम्यान आज वाल्मीक कराड यांना शरण येण्यासाठी वापरली कारच पासिंग बीडमध्ये करण्यात आली आहे.. दरम्यान वाल्मिक कराड यांनी सरेंडर केल्यानंतर त्याला अटक होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.. सीआयडीने वाल्मीक कराड यांची कसून चौकशी केली या चौकशीनंतर त्याला मेडिकल चेकअप साठी रुग्णालयात नेण्यात आला आहे त्यामुळे कराड याच्या अटकेची चर्चा सुरू झाली आहे..