राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड काल पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला.यानंतर त्याची काही तास चौकशी केल्यानंतर त्याला कोर्टात हजर राहण्यासाठी बीडला रवाना करण्यात आले. त्यानंतर आरोपीच्या रिमांड बाबत सुनावणी झाली.गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाल्मीकवर केवळ खंडणीचा आरोप नसून हत्या प्रकरणाचाही आरोप असल्याने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली..यामध्ये दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून अखेर केज न्यायालयाने वाल्मीकला 14 दिवसाची सीआयडी कोठडी सुनावली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी पथक पुण्याहून मंगळवार रात्री उशिरा साडेनऊ वाजण्याच्या सुमारास केज शहरात दाखल झाले. त्यानंतर केज पोलीस ठाण्यात सीआयडी पथकाने दाखल होत तांत्रिक गोष्टी पूर्ण केल्या..या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर कराड यांना केज कोर्टात हजर करण्यात येणार होतं.. पण त्यापूर्वीच न्यायालयाने वाल्मीक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची कोठडी सुनावली.
दरम्यान केज कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला..हा युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची तुफान गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. त्यानंतर कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. सीआयडीने 15 दिवसाची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने 14 दिवसाची कोठडी दिली आहे. सीआयडीचं हे मोठं यश असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कराडला मोठा धक्का बसला आहे.