राजमुद्रा : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिल आहे..देशात जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण झाली..आज 1 जानेवारी 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडर 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आली नाही.
गेल्या पाच महिन्यात व्यवसाय गॅस सिलेंडरच्या किमतीत साताऱ्याने वाढ झाली होती.. आता नवीन वर्षाच्या तोंडावर गॅस किमतीत घट झाली असून आज 1 जानेवारी रोजी सिलिंडरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. यानुसार, दिल्लीमध्ये 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलिंडर 1804 रुपयांना, मुंबईत 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1966 रुपये तर कोलकाता शहरात 1911 रुपयांना मिळणार आहे.यापूर्वी मागच्या वर्षी जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग वाढ दिसून आली. तर, घरगुती गॅसचे दर अजूनही जैसे थेच आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त झाला होता.
एलपीजी सिलेंडर आजपासून 14.50 रुपयांनी स्वस्त झाला असून सिलेंडरच्या दरात झालेली ही कपात संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे..