राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईड वाल्मीक कराडने सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली.. मात्र या शरणागती नाट्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे..यावरून आता छत्रपती संभाजीराजे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी शंका उपस्थित केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची चर्चा झाली आणि त्यानंतर वाल्मीक कराडने सरेंडर केलं. त्या चर्चेत काय दडलंय ते समोर यायला पाहिजे असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
गेल्या 22 दिवसांपासून वाल्मीक कराड हा फरार होता.. त्याच्यामागे सीआयडीची नऊ पथक होती पण वाल्मीक कराड सीआयडीच्या हाती लागला नाही. विशेष म्हणजे सीआयडी समोर सरेंडर होण्याआधी एक व्हिडिओही त्याने जारी केला. ज्यात राजकीय द्वेषातून आपल्यावर आरोप होत असल्याचं म्हटलेलं आहे. तोपर्यंत सीआयडीला वाल्मीकचा पत्ताही लागला नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्यानंतर वाल्मिक कराड शरण आला. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर येणं गरजेच आहे असे छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटला आहे..
दरम्यान ज्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मीक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात आला ती गाडी अनिता शिवलिंग मोराळे यांच्या नावावर आहे. हा शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे. त्याच्या फेसबुकच्या डीपीवरही शिवलिंग मोराळे आणि धनंजय मुंडेंचा फोटो आहे. म्हणजेच काय वाल्मीक कराडने वेळ, ठिकाण आणि गाडीही स्वतःच्याच मनाने निवडली. वाल्मीक कराड पुण्याच्या सीआयडीच्या कार्यालयात येईपर्यंत सीआयडीला कानोकांत खबर लागली नाही. अशी शंकाही त्यांनी उपस्थित केले आहे.
मास्टरमांड वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवरतीय असल्याने त्यांला वाचवल जाते असा आरोपही होतोय पण अखेर सरेंडर का होईना तो पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्येवरून सर्व काही समोर येईल अशी आशा आहे.