राजमुद्रा : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आल आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी पंढरपुरातील विठुरायाला आपलं पवार कुटुंबीय एकत्र यावं असं साकडे घातले.त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य समोर आलं आहे. “शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित येणे चांगली गोष्ट आहे”, असं मोठं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.. त्यामुळे आगामी काळात काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
पवार कुटुंबीय एकत्र यावे यावरून बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल असेही म्हणाले की, शरद पवार हे आमचे दैवत आहेत. काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था आहे. भविष्यात सुद्धा पवार कुटुंबीय एकत्रच आलं तर यात काही गैर नाही. कारण मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो आणि पवार कुटुंब एकत्र यावं, अशी माझी सुद्धा इच्छा आहे.. त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..
दरम्यान या पवार कुटूंबीयाच्या एकत्र येण्यावर दुसरीकडे मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य समोर आलं आहे. “जसं बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील, तर माझ्या छातीत शरद पवार आहेत”, असं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. त्याने अनेकदा शरद पवार यांच्यासोबत अशी सूचक वक्तव्य केले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा झिरवाळ यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होत आहे