राजमुद्रा : अहिल्यानगर येथील युवा उद्योजक व समाजसेवक अभय यशवंत मिस्त्री यांचा भव्य दिव्य सांस्कृतिक वैभव असलेला विवाह सोहळा पालघर येथील द पर्न शेल्टर या ठिकाणी थाटात पार पडला आहे, या विवाह सोहळ्यामध्ये राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उद्योजक क्षेत्रात असल्याकारणाने राज्यभरात असलेला जनसंपर्क तसेच राजकीय व विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी युवा उद्योजक आदित्य मिस्त्री यांच्या विवाह सोहळ्यात आवर्जून उपस्थिती लावली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम, व पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळ्यात रंगत आली होती यावेळी मिस्त्री परिवारासह उपस्थित त्यांनी विविध कार्यक्रमांच्या मेजवानीचा आनंद लुटला आहे. नव दापत्य आदित्य व ऐश्वर्या यांना भावी वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.