राजमुद्रा : आगामी असणाऱ्या निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जोमाने तयारीला लागला असतानाच आता दुसरीकडे ठाकरे गटाचे कोकणातील ताकदवान नेते तथा लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे..
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा दारुण पराभव झाला.. मात्र निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर ही पक्षांच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे राजन साळवी हा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.. उद्या 12 जानेवारीला भाजपच्या शिर्डी येथील होणाऱ्या अधिवेशनात राजन साळवी यांचा प्रवेश निश्चित असल्याचं स्पष्ट झाला आहे..भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरेंना रामराम करून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने याबाबत आता भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.. राजन साळवी शिवसेनेचे एक चांगले कार्यकर्ते आहेत उरलेले उभाठाचे नेते अस्वस्थ आहेत असं म्हणत त्यांनी राजन साळवी यांच कौतुक केला आहे.राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहेत.पण अचानक आता ते भाजपात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजन साळवी हे निकटवर्तीय मानले जात होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी साळवी यांचं कौतुक करण्यात आलं आहे. असं असताना ठाकरेंचा ताकदवान शिलेदाराला आपल्या पक्षात वळवण्यात भाजपला यश येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे..