राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेला वाल्मीक कराड हा सध्या कराड बीड शहर पोलीस ठाण्यात आहे. आता या ठाण्यात तातडीने पाच नवीन पलंगांची व्यवस्था करण्यात आली आहे.. याहून राजकीय वर्तुळात हा पलंग महायुतीच्या लाडक्या आरोपीसाठी आणल्याची चर्चा रंगली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अचानक ठाण्यात पाच पलंग कशासाठी?असा सवाल उपस्थित करत मोठा दावा केला आहे..
रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांनी एक्स वर अशी पोस्ट केली आहे की , बीड पोलीस ठाण्यामध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत..स्टाफ साठी नवीन पलंग मागवल्याच प्रशासनानं स्पष्ट केला असला तरी अचानक पलंग कसे मागवले असा प्रश्न उपस्थित केला आहे. पोलीस स्टेशनच्या स्टाफ ची इतकीच खातिरदारी करायचे असेल तर राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ साठी दाखवायला हवी असे तत्परता असे देखील त्यांनी म्हटले आहे.. त्यांनी या पोस्टमध्ये कोणाचाही नाव लिहिलं नसलं तरी एकंदरीत हा पलंग आरोपीसाठी आणला नाही ना? असा संशय व्यक्त केल्याच दिसून येत आहे.
वाल्मीक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. आणि त्याचा आणि देशमुख यांच्या हत्येचा कनेक्शन असल्याच समोर आला आहे त्यामुळे पोलिस आणि सीआयडी वाल्मीक कराड वर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे..