राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली आहे.. त्यानंतर त्याची सीआयडी चौकशी बीड पोलीस ठाण्यात होत आहे.. यावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिकी कराडचे एन्काऊंटर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.. तसेच त्यांना ही माहिती एका मोठ्या अधिकाऱ्याने दिली असल्यासही त्यांनी सांगितलं आहे.. त्यामुळे या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
वाल्मीक कराड हा आरोपी असून पोलीस ठाण्यात त्याचे लाड केले जात आहेत..त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले. त्यावर पोलिसांसाठी बेड आणल्याचा खुलासा केला. पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाही. कराड याला झोपवण्यासाठी ते बेड आणले काय याची चौकशी झालीच पाहिजे असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे.
बीड प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचे बीड पोलीस ठाण्यात लाड पुरवले जात असल्याने यावरून आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत महायुती सरकारवर आरोप केले आहे. त्यांनी म्हटले की, महायुतीच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मीक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल! असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे..