राजमुद्रा : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत भाजप हा मोठा पक्ष ठरला.. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह मोडवर आले असून त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांसाठी निवडणूक कार्यशाळा झाली.यावेळी राज्यातील मोजक्या पदाधिकाऱ्यांना खास टिप्स देण्यात आल्या.. कोणत्याही स्थितीत आगामी निवडणुका जिंकायच्या असा निर्देश त्यांनी या पदाधिकाऱ्यांना दिला..
कोणत्याही निवडणुकीकडे भाजप हा गांभीर्याने पाहतो.. या धर्तीवर आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत..नाशिकचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी यावेळी त्यांना आगामी निवडणुकीत भाजप अतिशय प्रभावी कामगिरी करेल महापालिकेत स्वबळावर सत्तेत येईल असा दावा केला आहे.. त्यामुळे भाजपने या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे..
दरम्यान दुसरीकडे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप ठाकरेंना धक्का देणार आहे.