राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाला गळती लागली असून आता ठाकरे गट भाजपच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत आहे.. नुकताच ठाकरे गटाचे कोकणातील ताकदवान नेते तथा लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला असताना आता त्याच्यानंतर माजी नगरसेवक ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत..
आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट जोमाने तयारी लागत असताना दुसरीकडे पक्षातील ताकदवान असणारे नेते भाजपच्या वाटेवर जात आहेत.. त्यामुळे निवडणुका आधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे..आता फक्त राजन साळवीच नाही, तर पुण्यातील ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवकही भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या पाच माजी नगरसेवकांनी मुंबईत जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ते पुण्यात जाहीर कार्यक्रमात प्रवेश करणार अशी माहिती आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटात वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असल्याने बाहेर पडत असल्याचाही आरोप काही जणांनी केला आहे.. अशातच आत दुसरीकडे विलेपार्ल्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी जितेंद्र जनावळे हे सुद्धा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे फक्त एक आमदार नाही, तर माजी नगरसेवकाही भाजप-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का असणार आहे..
दरम्यान अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना विविध राजकीय आव्हान पेलावी लागत असताना आता पक्ष एकसंध ठेवण्याच सर्वात मोठ आव्हान त्यांच्यासमोर उभ आहे.