राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून कोकणातील राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.. या चर्चावर आता स्वतः राजन साळवी यांनी स्पष्टीकरण दिल आहे.. मी भाजपच्या वाटेवर आहे मला तुमच्या माध्यमातून समजतय..या सर्व अफवा आहेत..मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांचाचं सैनिक राहणार याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिलं..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, पराभव झाल्याची मोठी खंत, वेदना मला व मतदारसंघातील माझ्या जनतेला आहेत मात्र मी नाराज नाही.. त्यामुळं मी भाजपात पक्ष प्रवेश करणार ही सर्व अफवा आहे. त्यामुळे राजन साळवी हे ठाकरे गटातच राहणार असल्याचे स्पष्ट झाल आहे..
गेल्या काही दिवसापासून राजन साळवी हे भाजपात पक्षप्रवेश करणार यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आबिटकर म्हणाले, की राजन साळवी येणार असतील, तर स्वागत आहे. यावर साळवी म्हणाले की, “पक्षात येणाऱ्या प्रत्येक माणसाच स्वागत करण्याची भावना असते. मी मतदारसंघात संघटन कौशल्याने काम केलय. त्या भावनेने ते बोलत असतील.. असं त्यांनी म्हटलं आहे.
या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्री वर बैठक बोलावली.. तसेच आत्मचिंतन ही केलं.. योग्य सूचना देण्यात आल्या.. मात्र भाजपमधून आपल्याशी कोणाचाही संपर्क नाही स्पष्ट त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला..