राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने बाजी मारल्यानंतर सत्तेत आलेल्या या महायुती सरकारची नववर्षातील पहिली मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. खातेवाटप झाल्यानंतर मुंबईत होणारी ही पहिलीच बैठक असल्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं..दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत धडाकेबाज निर्णय घेण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय –
– महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)
– शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी (वित्त विभाग)
दरम्यान शासनाच्या यादीवर मुंबई जिल्हा बँकेला घेऊन व्यवहार करण्याची मुभा दिल्याबद्दल प्रवीण दरेकर यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खातेवाटप होऊन आठवडा झाल्यानंतरही काही मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नसल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. वाल्मिक कराड प्रकरणात आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले धनंजय मुंडेही या बैठकीला हजर होते.