राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराड सध्या बीड शहर पोलीस ठाण्यात आहे.. आता कोठडीत असताना त्यांनी मोठी मागणी केली आहे..त्यांने न्यायालयाकडे धाव घेतली असून 24 तास मदतनीस मिळावा अशी मागणी केली आहे.. त्यामुळे वाल्मीक कराड याला काय आजार आहे? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत..
वाल्मीक कराड याने त्याला स्लीप ॲप्निया या नावाचा आजार असल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली आहे.. हा आजार असल्यामुळे 24 तास मदतनीस मिळावा यासाठी त्यांने दाद मागितली आहे. कोठडीत असताना ऑक्सिजन मशीन दररोज लावण्याची गरज आहे. या आजारात ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावण्यात येते. ते चालवण्यासाठी एक मदतनीस 24 तास आवश्यक असल्याने, हा असिस्टंट आपल्याला देण्यात यावा अशी विनंती त्याने केली आहे. त्याने केज न्यायालयाकडे ही विनंती केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने शासकीय वैद्यकीय सुविधा पुरवण्याविषयी सुचवल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान काल या पोलिस ठाण्यात पाचं पलंग आणण्यात आले होते.. यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं..
आता या बीड प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्या मार्गावर सीआयडी आहे.. सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुले याच्यावर आहे. सुदर्शन घुले या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. खूनाच्या घटनेपासून सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत
याचा शोध आता ते घेत आहेत..