राजमुद्रा : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि छगन भुजबळ आता एकाच मंचावर येणार आहेत.पुण्यानजिकच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे.या अनावरण सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत.. त्यामुळे शरद पवारांसमोर छगन भुजबळ नेमकी काय भूमिका मांडतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे..
गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात भेट झाली आहे. पक्ष फुटल्यानंतर भुजबळांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. ते अजितदादांसोबत गेले. पण त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले आहे. उलट त्यांनी पवारांबद्दल आदरभाव दाखवला आहे. आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.. यानंतर ते भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा ही रंगली होती.. मात्र आता छगन भुजबळ, अजित पवार,शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर येणार आहे त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
या अनावरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निमंत्रित करण्यात आल आहे.मात्र ते या सोहळ्याला उपस्थित राहणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.. ते परदेशात गेले असल्याची माहिती देखील भुजबळ यांनी दिली आहे.. आता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असणार आहेत.