राजमुद्रा : राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. मात्र या योजनेवरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सर्वात ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच आहे असा प्रचार केला.. राज्य सरकार तिचा फेर विचार करेल असाही प्रचार त्यांनी केला.. यानंतर त्यांचा हा दावा आता खरा ठरला असल्याचा समोर आला आहे.. या योजनेसाठी आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नवीन निकष जाहीर केले आहेत.या योजनेच्या अर्जाचीं आता छाननी करण्यात येणार असल्याची मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी योजने संदर्भात चर्चा केल्यानंतर छाननी चा निर्णय घेण्यात आल्याचा तटकरे यांनी स्पष्ट केलं..
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून. वेगवेगळ्या माध्यमातून काही अपात्र लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं विभागाला समजलं आहे. त्यानुसार आता ज्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत अशा अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पडताळणी सरसकट केली जाणार नाही असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात त्याचे निकषही आता ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा फटका किती लाडक्या बहीणांनी बसणार हे काही दिवसातच समोर येणार आहे.. त्यांच्या या निर्णयामुळ लाडक्या बहिणीची धाकधूक वाढले असून आता पात्र महिलांनाच याचा लाभ घेता येणार आहे.
दरम्यान या योजनेत आता सरकारला बोगस अर्ज आल्याचे वाटत आहे.. खरं पाहता या योजनेचा आर्थिक बोजा सरकार यावर पडत असल्यामुळे पुन्हा या अर्जांची छाननी करण्यासाठी निर्णय घेतला आहे.. त्यामुळे आता मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या नव्य निकषामुळं विरोधकांनी केलेला त्यावेळेचा धावा खरा ठरण्याचे चिन्ह दिसून येत आहेत..