राजमुद्रा : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच राजकारण चांगलच रंगतदार होत चालल आहे.. अशातच आता आगामी होणाऱ्या 2029 च्या लोकसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.. आतापासूनच त्यांनी 2029 ची लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.. लोकसभा निवडणुकीला सुमारे साडेचार वर्ष बाकी असताना आता त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.
आगामी असणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलेल्या इच्छेने सर्वांच्या भुवया उंचावले आहेत.. आगामी 2019 मध्ये मतदारसंघाचे पुनर्रचना होणारे तर काही मतदारसंघाची वाढ होणार आहे..सर्वच परिस्थिती अस्थिर व अनिश्चित असताना आता त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने सर्वांना धक्का बसला आहे..
दरम्यान नुकत्याच झालेल्या 2024 च्या निवडणुकीत त्यांनी ही निवडणूक लढवली नव्हती.. मात्र त्याआधीची निवडणूक लढवल्यानंतर भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांनी त्यांचा पराभव केला होता.. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर लगेचच शरद पवार यांनी त्यांना राज्यसभेवर नियुक्त केलं. मात्र ते शरद पवार यांना सोडचिट्टी देत अजित पवार यांच्यासोबत बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि नव्याने राज्यसभेची निवडणूक लढवली.. दरम्यान आता आगामी निवडणुकीसाठी राजकीय पेरणीचीं तयारी प्रफुल पटेल यांनी केली असल्यच दिसून येत आहे.